
उत्तर प्रदेशातील मथुरा इथं यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय. इको कारने मागून ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला. तर ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेत.