ईडीचे राणा आयुब यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप; जप्त केले 1.77 कोटी

ed attaches 1.77 crore rupee  belonging to rana ayyub alleges money laundering
ed attaches 1.77 crore rupee belonging to rana ayyub alleges money laundering
Updated on

अंमलबजावणी संचालनालय (ED) ने गुरुवारी पत्रकार राणा आयुब (Rana Ayyub) यांचे कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी तब्बल 1.77 कोटी रुपये जप्त केले आहेत. केंद्रीय तपास संस्थेने अय्युब यांच्यावर देणगी म्हणून मिळालेल्या पैशाचा वैयक्तिक खर्चासाठी वापर केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने गेल्या वर्षी अय्युब यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली होती. यूपी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, तक्रारदार विकास सांकृत्यायन यांनी आरोप केला होता की, राणा अय्युब यांनी केट्टोसंबंधीत मदत निधी मोहिमेद्वारे बेकायदेशीरपणे सार्वजनिक पैसे मिळवले होते.

त्यांनी कथितपणे 3 सामाजिक कामासाठी दिलेल्या देणग्या योग्य हेतूसाठी वापरल्या नाहीत. देणग्यांचा काही भाग कथितपणे वैयक्तिक खर्चासाठी वापरला गेला, असा आरोप ईडीचे अधिकारी करत आहेत

ed attaches 1.77 crore rupee  belonging to rana ayyub alleges money laundering
जग्वार, लँड रोव्हर नाही, तर रतन टाटांना मिळाली खास इलेक्ट्रिक नॅनो

ईडी आणि आयकर विभाग दोन्ही या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत. तसेच ईडीने असा दावा केला आहे की अय्युब यांना एफसीआरए (फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्ट) अंतर्गत कोणतीही मान्यता न घेता परदेशी देणग्या मिळाल्या आहेत, परदेशातून कोणताही देणगी घेण्याआझी मान्यता घेणे अनिवार्य आहे.

ed attaches 1.77 crore rupee  belonging to rana ayyub alleges money laundering
उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com