esakal | काँग्रेसला मोठा धक्का; एजेएलच्या संपत्तीवर ईडीची टाच
sakal

बोलून बातमी शोधा

ED attaches Rs 16.38 cr worth of Mumbai AJL asset names Moti Lal Vora

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्या 16.38 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का; एजेएलच्या संपत्तीवर ईडीची टाच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्या 16.38 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

मुंबईच्या वांद्रे कलानगर भागातील नऊ मजली इमारतीच्या तळमजल्यात 15 हजार चौरसफुटाचे असलेले कार्यालय जप्त करण्यात आले आहे. या इमारतीची एकूण किंमत 120 कोटी रुपये आहे. त्यातील 16.38 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीचे म्हणणे आहे, की हे प्रकरण हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा आणि काँग्रेसचे माजी खजिनदार मोतीलाल व्होरा यांच्याशी संबंधित आहे.

भीषण : ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या ५ मजुरांचा अपघातात मृत्यू

हरियानातील पंचकुलामध्ये बेकायदेशीरपणे ताबा घेतलेल्या भूखंडावर सिंडिकेट बॅंकेकडून कर्ज घेऊन मुंबईत इमारत बांधण्यात आली होती. हा भूखंड ईडीने आधीच जप्त केला आहे. संपत्ती जप्तीचा आदेश ‘ईडी’ने एजेएल (असोसिएटेड जर्नल लिमिटेड) या कंपनी आणि मोतीलाल व्होरा यांच्या नावाने काढला आहे. नॅशनल हेरल्ड वर्तमानपत्र प्रसिद्ध करणाऱ्या ‘एजेएल’वर काँग्रसचे नियंत्रण असून गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोतिलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडीस आणि सॅम पित्रोदा यावर संचालक आहेत.