WazirX ला ईडीचा दणका, ६४.६७ रुपयांची मालमत्ता गोठवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED Cryptocurrency Exchange WazirX freezes assets finance delhi

WazirX ला ईडीचा दणका, ६४.६७ रुपयांची मालमत्ता गोठवली

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज वझीरएक्स’ची ६४.६७ रुपयांची बँक मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने गोठवली आहे. ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.अनेक भारतीय बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि त्यांच्या फिनटेक भागीदार रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असून कर्जाचे उच्च व्याजदर आकारत आहेत.

तसेच या कंपन्यांचे टेली-कॉलर कर्जदारांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून त्यांच्याशी अपमानास्पद भाषेत बोलत असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने याचा तपास सुरू केला आहे. हा तपास सुरू झाल्यापासून, फिनटेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात निधी क्रिप्टो मालमत्ता खरेदी करण्याकडे वळवला असून बेकायदेशीररित्या परदेशात पैसा हस्तांतरीत केला आहे. मोठ्या प्रमाणात असा निधी ‘वझीरएक्स’ एक्सचेंजमध्ये वळवण्यात आला आणि खरेदी केलेली क्रिप्टो मालमत्ता परदेशात पाठवण्यात आल्याचे आढळून आल्याचे सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे.

Web Title: Ed Cryptocurrency Exchange Wazirx Freezes Assets Finance Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..