Wed, May 25, 2022

जहांगीरपुरी प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल
Published on : 24 April 2022, 1:54 am
नवी दिल्ली : जहांगीरपुरीत घडलेल्या हिंसाचारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपी अन्सार याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी ‘ईडी’ला पत्र पाठल्यानंतर हा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. जहांगीरपुरी परिसरात १६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी दंगल उसळली होती.
ईडी अन्सारसह अन्य आरोपींविरोधातही आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) तपास करणार आहे. दिल्ली पोलिसांकडून अन्सार तसेच हिंसाचारात त्यांच्या भूमिकेसंबंधी कागदपत्रे ‘ईडी’कडे पाठवण्यात आली आहे. अन्सार तसेच इतरांना कुठल्या संघटनेकडून अथवा व्यक्तिकडून पैसा पुरवण्यात आले का? याचा वापर हिंसारासाठी करण्यात आला का? याअनुषंगाने ईडी तपास करणार आहे.
Web Title: Ed Files Case Jahangirpuri Investigate Accused Under Prevention Financial Abuse Act
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..