पी. चिदंबरम, कार्ती यांच्यावर ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल 

वृत्तसंस्था
Thursday, 4 June 2020

सक्तवसुली संचालनालयाने ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे.‘ईडी’ने मनी लाँडरिंग प्रकरणात हे आरोपपत्र दिल्ली न्यायालयात सादर केले आहे.

नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. ‘ईडी’ने मनी लाँडरिंग प्रकरणात हे आरोपपत्र दिल्ली न्यायालयात सादर केले आहे. हे आरोपपत्र ई-सुविधेच्या माध्यमातून पासवर्ड संरक्षण असलेल्या ई-फाईलद्वारे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मात्र, न्यायालयाने ‘ईडी’ला न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरू झाल्यावर कागदी स्वरुपात (हार्ड कॉपी) हे आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

चिदंबरम पिता-पुत्रांव्यतिरिक्त या आरोपपत्रात कार्ती यांचे चार्टंर्ड अकाऊंटंट एस.एस. भास्करारामन आणि इतरांचाही समावेश आहे. ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ॲक्ट' (पीएमएलए) अंतर्गत चिंदबरम आणि कार्ती यांच्यावर "ईडी'ने पहिल्यांदाच आरोपपत्र दाखल केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील वर्षी २१ ऑगस्टला पी चिदंबरम यांना सीबीआयने "आयएनएक्स मीडिया' प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन दिला होता. "ईडी'च्या प्रकरणात चिदंबरम यांना ४ डिसेंबरला जामीन मिळाला होता. वर्ष २००७ मध्ये अर्थमंत्री असताना ३०५ कोटी रुपयांच्या परकी फंडासंदर्भात केलेल्या परकी गुंतवणूक प्रसार मंडळाच्या अनियमिततेसंदर्भात सीबीआयने १५ मे २०१७ ला चिदंबरम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED files chargesheet against P Chidambaram & Karti Chidambaram