ED ची भीती कुणाला दाखवता, हिंमत असेल तर अटक करून दाखवा; अभिषेक बॅनर्जींचं शहांना थेट चॅलेंज

'..तर माझी खुलेआम फासावर लटकण्याची तयारी आहे.'
Abhishek Banerjee vs Amit Shah
Abhishek Banerjee vs Amit Shahesakal
Summary

'..तर माझी खुलेआम फासावर लटकण्याची तयारी आहे.'

गेल्या दोन-तीन वर्षांपासून भाजप ईडीची (ED) भीती दाखवून अनेक राजकीय नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असतानाच, आता आणखी एका नेत्यानं भाजपला (BJP) खुलं आव्हान दिलंय. कोळसा तस्करी प्रकरणात ईडीनं शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांची सुमारे सात तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

हिंमत असेल तर मला अटक करून दाखवाच, असं खुलं आव्हान त्यांनी अमित शहांना दिलंय. ईडीनं बजावलेल्या समन्सनुसार, अभिषेक बॅनर्जी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले. या चौकशीनंतर त्यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागलीय.

Abhishek Banerjee vs Amit Shah
POCSO न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांची आत्महत्या; पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

कोळसा तस्करी आणि प्राण्यांची तस्करी हे सर्व गृह मंत्रालयाच्या अंतर्गत घडलेय. त्यामुळं याला गृहमंत्री घोटाळाच म्हणायला हवं. गृहमंत्री शहा हे सर्वात मोठे पप्पू आहेत. त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. सर्वात आधी त्यांनी आपल्या मुलाला देशभक्तीचा धडा शिकवावा. प्राण्यांच्या तस्करीचा सगळा पैसा त्यांच्या मुलाकडंच गेला आहे. सीमेवर बीएसएफ तैनात आहे. बीएसएफ कोणाच्या अखत्यारित येतं? प्राण्यांची तस्करी होत असताना बीएसएफ काय करत होती? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केलाय. कोळसा तस्करीतून मी पाच पैसेही घेतल्याचं सिद्ध झालं तर माझी खुलेआम फासावर लटकण्याची तयारी आहे. सध्या केंद्रीय गृह मंत्रालय आम्हाला ईडी आणि सीबीआयचा वापर करून घाबरवण्याचं काम करतेय. पण आम्ही घाबरणार नाही, असंही अभिषेक बॅनर्जींनी मोदी सरकारला ठणकावून सांगितलं.

Abhishek Banerjee vs Amit Shah
Narendra Modi : दलित-आदिवासींना नरेंद्र मोदी देवासमान वाटतात : मंत्री गजेंद्र शेखावत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com