ED raid on Congress MLA Veerendra Pappi
esakal
बेकायदेशीर ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
काँग्रेस आमदारांच्या घरातून ५० कोटींचे सोने जप्त
आतापर्यंत १५० कोटींचा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती
बंगळूर : चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या अडचणीत (ED raid on Congress MLA Veerendra Pappi) आणखी भर पडली आहे. बेकायदेशीर ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणाच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या चळ्ळकेरे येथील घरावर आणि फेडरल बँकेतील दोन लॉकरवर छापा टाकून तब्बल ५०.३३ कोटींचे सोने जप्त केले.