

ED Raid Coal Mafia jharkhand
esakal
Dhanbad ED Raid : झारखंडमधील धनबाद येथे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अवैध कोळसा उत्खनन, तस्करी, खंडणी व मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने ३१ ठिकाणी छापे टाकून कोळसा व्यावसायिक लाल बाबू सिंह (एल. बी. सिंह), अनिल गोयल आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांची झडती घेतली.