
रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य यांच्याशी निगडित ठिकाणांवर सक्तवसूली संचालनालयाच्यावतीने(ईडी) सोमवारी छापे घालण्यात आले. चैतन्य यांच्यावर मद्यगैरव्यवहार प्रकरणी आरोप करण्यात आले असून त्या पार्श्वूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.