
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या काही कार्यालये आणि ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. गृहमंत्र्यांच्या ठिकाणांवरच टाकलेल्या या छाप्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. कन्नड अभिनेत्री रान्या राव सोने तस्करी प्रकरणाशी संबंधित हे छापे असल्याची माहिती समोर येत आहे. ईडी या प्रकरणी आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा तपास करत आहे. पीएमएलए अंतर्गत राज्यभरात १६ ठिकाणी छापा टाकण्यात आला.