ED Raids : बँक गैरव्यवहारप्रकरणी राजद आमदारावर छापे; ‘ईडी’ची बिहार, कोलकता, उत्तर प्रदेशात कारवाई
Bank Fraud : बिहारच्या राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने राजद आमदार अलोक कुमार मेहता यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर छापे घातले. बिहार, कोलकता, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील जवळपास १८ ठिकाणी ईडीने झाडाझडती घेतली.
पाटणा : बिहारच्या राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज बिहारसह अनेक राज्यांत राजदचे आमदार अलोक कुमार मेहता यांच्याशी संबंधित निवासस्थान, कार्यालयावर छापे घातले.