
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांच्या निवासस्थानी आज सक्तवसुली संचालनालयाने छापे घातले. रुग्णालय बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात हे छापे घालण्यात आले. या प्रकरणात भारद्वाज आणि सत्येंद्र जैन या माजी मंत्र्यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या कारवाईनंतर आप नेत्यांनी टीकास्त्र सोडत केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.