बंगळूर : महर्षी वाल्मीकी आदिवासी कल्याण मंडळ घोटाळ्याप्रकरणी (Valmiki Corporation Scam) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ६० अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी (ता. ११) बळ्ळारी जिल्ह्यातील चार काँग्रेस (Congress) आमदार आणि एका खासदाराच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. सकाळी बळ्ळारीतील पाच आणि बंगळूर शहरातील तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.