Arvind Kejriwal : CM अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ? कथित दारू घोटाळा प्रकरणी ईडीकडून नवव्यांदा समन्स

ED Summons to Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED कडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आलं आहे.
ED Summons to Arvind Kejriwal
ED Summons to Arvind Kejriwal Esakal

ED Summons to Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED कडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल यांना EDने हे नववं समन्स पाठवलं आहे. नवीन समन्सनुसार अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री केजरीवाल यांना ९व्यांदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास यंत्रणेने त्यांना २१ मार्च २०२४ रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आता या वेळीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर होतात की नाही हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

ED Summons to Arvind Kejriwal
Crime News : नवऱ्याची करामत; शिक्षिका असलेल्या बायकोचं मानसिक वय दाखवलं ११ वर्षे; कोर्टाने उपटले कान...

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने केजरीवाल यांना यापूर्वी 8 वेळा समन्स पाठवले आहेत, परंतु ते चौकशीसाठी एकदाही हजर झाले नाहीत. ईडीने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.

ED Summons to Arvind Kejriwal
Swami Prasad Maurya: 'लक्ष्मीला चार हात कसे असतील?' म्हणणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com