esakal | खाद्य तेलांच्या किंमती होणार कमी; केंद्रानं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Food Oil

खाद्य तेलांच्या किंमती होणार कमी; केंद्रानं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानं त्याचा परिणाम महागाईत वाढण्यावर झाला आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु असल्याने या काळात खाद्य तेलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यापार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने विविध खाद्य तेलांवरील करांमध्ये कपात केली आहे. यामुळे तेलाच्या किंमतीही कमी होतील, अशी आशा आहे. ११ सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासूनच हा निर्णय लागू होणार आहे.

सरकारच्या निर्णयानुसार, कच्चे पाम, सोयाबिन आणि सूर्यफूल या तेलाच्या बेसिक आयात शुल्क २.५ टक्के करण्यात आलं आहे. जे शुल्क यापूर्वी कच्च्या पाम तेलावर १० टक्के तर कच्च्या सोयाबिन आणि सूर्यफूल तेलावर ७.५ टक्के होतं. तसेच रिफाईंड पाम, सोयाबिन आणि सूर्यफूल तेलांच्या बेसिक आयात शुल्क ३७.५ टक्क्यांवरुन कमी करत ते ३२.५ टक्के करण्यात आलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही घोषणा केली आहे.

खाद्य तेलांवर लागणार इतका कर

आयात शुल्कात कपानीनंतर आता कच्चं पाम तेल, सोयाबिन तेल आणि सूर्यफूल तेलावर २४.७५ टक्के कर लागणार आहे. यामध्ये २.५ टक्के बेसिक आयुत शुल्क आणि इतर कर लागू असतील. त्याबरोबर रिफाईंड पाम, सोयाबिन आणि सनफ्लॉवर तेलाच्या आयात शुल्कात आता ३५.७५ टक्के कर लागेल. यामध्ये बेस आयात शुल्काचाही समावेश असेल.

सहा वर्षातील निचांकी पातळीवर राहिल खाद्य तेलांची आयात

या वर्षी खाद्य तेलांची आयात गेल्या सहा वर्षातील निचांकी पातळीवर राहू शकते. इंडस्ट्री बॉडी सॉल्वेंट एक्सट्रॅकर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) चे वरिष्ठ एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. बी. व्ही मेहता यांच्या माहितीनुसार, कोरोनाचं संकट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या खाद्य तेलांच्या किंमतींमुळे सलग दोन वर्षात आयातीवर परिणाम होऊ शकतो.

तेलाच्या किंमती कमी होतील

केंद्र सरकारनं उचललेल्या आयात शुल्क कपातीच्या निर्णयामुळं तेलांच्या किंमतीत कपात होऊ शकते. त्यामुळे त्याच्या मागणीतही वाढ होईल. भारत वनस्पती तेलांचा सर्वाधिक आयात करणारा देश आहे. देशातील दोन तृतीयांश खाद्य तेलाची मागणी आयात तेलातून पूर्ण होते. इंडोनेशिया आणि मलेशियातून भारतात पाम तेलाची आयात होते.

loading image
go to top