अयोध्यावासीयांना हवे शिक्षण आणि सुरळीत जीवन

पीटीआय
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिकतेवर आधारित असला तरी स्थानिक नागरिकांना या वादापेक्षा शिक्षण आणि सुरळीत दैनंदिन जीवनाबाबत अधिक काळजी आहे. 

अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिकतेवर आधारित असला तरी स्थानिक नागरिकांना या वादापेक्षा शिक्षण आणि सुरळीत दैनंदिन जीवनाबाबत अधिक काळजी आहे. 

आजच्या दिवशी अनेक संघटना विविध कार्यक्रम आयोजित करतात. अयोध्यावासी या कार्यक्रमांकडे "सालाबादप्रमाणे' या दृष्टिकोनातूनच पाहतात. ज्या शहरात राममंदिर बांधण्यासाठी "संपूर्ण देश' उत्सुक आहे, त्या शहरातील युवकांना आणि इतर नागरिकांना या राजकारणात न पडता शिक्षण घेणे आवश्‍यक वाटत आहे. "आजचा दिवस काही जणांसाठी शौर्याचा आहे, तर काहींसाठी दुःखाचा आहे. येथील विद्यार्थी मात्र आता समंजस झाले असून, त्यांच्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व आहे. ही मुले अयोध्येतील वाद आणि त्याचे परिणाम पाहतच मोठी झाली आहेत,' असे येथील प्राध्यापक नीलय तिवारी यांनी सांगितले. "सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राजकीय संघटनांमध्ये सहभागी होण्यापासून कोणालाही रोखले नसले, तरी अभ्यास करण्यातच भले आहे, हे बहुतांशी विद्यार्थ्यांना समजले आहे,' असे राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाचे कुलगुरू मनोज दीक्षित यांनी सांगितले.

अयोध्येतील वादाबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईलच, त्या वेळी याबाबतचे राजकारणही संपुष्टात येईल. अयोध्येतील सामान्य माणूस दैनंदिन गरज भागविण्यासाठी धडपडत असून, राजकीय घडामोडींकडे आता तो आकर्षित होत नाही, असे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education and Good Life wants to Ayodhya Residents