पंजाबच्या शिक्षणमंत्र्याचं धुमधडाक्यात लग्न! कोण आहेत IPS ज्योती यादव? ज्यांच्याकडून घेतले प्रेमाचे धडे

नांगलजवळील बिभोर साहिब गुरुद्वारामध्ये हरजोत सिंह बैंस आणि ज्योती यादव यांचा विवाह झाला.
Harjot Singh Bains Wedding News
Harjot Singh Bains Wedding News Sakal
Updated on

Harjot Singh Bains Wedding News : आम आदमी पक्षाचे (आप) आमदार आणि पंजाब सरकारमधील शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी शनिवारी रुपनगर जिल्ह्यातील एका गुरुद्वारात भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी ज्योती यादव यांच्याशी लग्न केले.

नांगलजवळील बिभोर साहिब गुरुद्वारामध्ये हरजोत सिंह बैंस आणि ज्योती यादव यांचा शीख रितीरिवाजांनुसार विवाह झाला. दोघांची नुकतीच एंगेजमेंट झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि इतर अनेक नेतेही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

रुपनगर जिल्ह्यातील आनंदपूर साहिब मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेले बैंस हे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. पेशाने वकील असलेले 32 वर्षीय बैंस हे आनंदपूर साहिबमधील गंभीरपूर गावचे रहिवासी आहेत.

Harjot Singh Bains Wedding
Harjot Singh Bains Wedding Sakal

2017 च्या निवडणुकीत त्यांनी साहनेवाल मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. बैंस यांनी यापूर्वी राज्यात आपच्या युवा शाखेचे नेतृत्व केले आहे. (Education Minister Harjot Singh Bains weds IPS officer Dr Jyoti Yadav; Kejriwal, Mann attend)

ज्योती यादव आयपीएस होण्यापूर्वी अण्णांच्या आंदोलनात सक्रिय होत्या. हरजोत बैंस हे पंजाब आम आदमी पार्टीचे नेते होते. अण्णांच्या आंदोलनातही बैंस यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्याचदरम्यान त्यांची ज्योती यादव यांच्याशी भेट झाली.

Harjot Singh Bains Wedding News
Dis’Qualified MP...राहुल गांधींच्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल

पंजाब केडरच्या आयपीएस अधिकारी यादव सध्या मानसा जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या यादव गेल्या वर्षी आप आमदार राजिंदरपाल कौर छीना यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादविवादानंतर प्रकाशझोतात आल्या.

ज्योती यादव यांनी बारावीनंतर बीडीएसचे शिक्षण घेतले होते आणि त्या डॉक्टर झाल्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. ज्योती यादव यांनी सन 2019 च्या नागरी सेवा परीक्षेत 437 वा क्रमांक मिळविला आहे.

हरजोत सिंह बैंसचे इंस्टाग्रामवर 71 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर IPS ज्योती यादव यांचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 68 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Harjot Singh Bains Wedding News
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com