esakal | शिक्षण पद्धतीचे आता ऑनलाइन-ऑफलाइन सूत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Education

शिक्षण पद्धतीचे आता ऑनलाइन-ऑफलाइन सूत्र

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनामुळे (Corona) शिक्षणाचे (Education) स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) (UGC) ऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन (Offline) असे संमिश्र शिक्षण देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानुसार ४० टक्के शिक्षण ऑनलाइन आणि उर्वरित शिक्षण वर्गामध्ये (Class) दिला जाणार आहे. परंतु या पद्धतीमुळे अनेकजण उच्च शिक्षणापासून दूर जातील, अशी चिंता व्यक्त करीत अनेक विद्यार्थी संघटनांनी त्यास विरोध केला आहे. (Education Process Online Offline Formula)

आयोगाच्या या संमिश्र शिक्षण पद्धती विरोधात या संघटनांनी राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली आहे. ऑल इंडिया फोरम टू सेव्ह पब्लिक एज्युकेशन या देशातील विविध विद्यार्थी संघटनांचा संघ असलेल्या संघटनेने हा विरोध दर्शविला आहे. या माध्यमातून उच्च शिक्षण संस्थांमधील विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नफेखोरी माजेल. तसेच शैक्षणिक दर्जावरही त्याचा परिणाम होणार आहे. आता सुरू असलेले ऑनलाइन शिक्षणातून कुठेही शिक्षणाचा दर्जा राखला जात नसताना आयोग असता निर्णय घेत असल्याचा टीका त्यात करण्यात आली आहे.

loading image
go to top