
CA Final Postponed: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील सध्याच्या तणावपूर्ण सुरक्षा परिस्थितीमुळे ९ मे २०२५ ते १४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या सीए फायनल, इंटरमीडिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स (PQC) परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.