Eid Mubarak : देशभरात बकरी ईदचा उत्साह

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

ईद मुबारक असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे, की ईद-उल-अजहानिमित्त माझ्याकडून खूप शुभेच्छा. आपल्या समाजातील शांतता आणि सौख्य कायम राहो. तर, राहुल गांधी यांनी सर्वांना ईद मुबारक असे म्हटले आहे. 

नवी दिल्ली : बकरी ईदनिमित्त आज (सोमवार) देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आज देशभरात बेकरी ईद उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबई, नवी दिल्ली, भोपाळ आणि तिरुअनंतपुरममध्ये सकाळीच नमाज अदा करण्यात आला. नमाज अदा करण्यासाठी मशीदीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते. नमाज अदा केल्यावर सगळ्यांनी एकमेकांना बेकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईद मुबारक असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे, की ईद-उल-अजहानिमित्त माझ्याकडून खूप शुभेच्छा. आपल्या समाजातील शांतता आणि सौख्य कायम राहो. तर, राहुल गांधी यांनी सर्वांना ईद मुबारक असे म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eid-Al-Adha celebrate in India PM Narendra Modi wishes