आंध्रात 'तितली'चे आठ बळी 

पीटीआय
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

ओडिशा/ अमरावती (आंध्र प्रदेश) (पीटीआय) : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले "तितली' हे अतितीव्र चक्रीवादळ गुरुवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यात आठ जण मृत्युमुखी पडले. ओडिशात जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अनेक घरांचे नुकसान झाले, झाडे व विजेच्या खांबांची पडझड झाली. 
ओडिशातील गंजम, खुद्रा, पुरी, जगतसिंहपूर, गजपती, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत आज सकाळी चक्रीवादळ धडकले. गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर येथे 

वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची तीव्रता पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत 126 किलोमीटर प्रतितासपर्यंत पोचली होती. वादळी पावसामुळे जीवितहानी झाली नाही. घरे, झाडे व विजेच्या खांबांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. पूर्व किनारपट्टीवरील तीन लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज सांगितले. वादळामुळे बालासोर येथे 117 मिमी, तर पारादीपमध्ये 11 मिमी पाऊस पडला. 

चक्रीवादळाच्या संकटामुळे राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये आप्तकालीन मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. 300 यांत्रिक नौका तयार ठेवण्यात आल्या. बाधित नागरिकांसाठी एक हजार 112 निवारा केंद्रे सुरू केली. गंजम व जगतसिंहपूर जिल्ह्यातील अनुक्रमे 105 व 18 गर्भवतींना रुग्णालयात दाखल केले. सर्व शैक्षणिक संस्था शुक्रवारपर्यंत (ता. 12) बंद ठेवण्यात येणार आहेत. वादळाचा तडाखा बसलेल्या भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 13 तुकड्या तैनात ठेवल्या आहेत, अशी माहिती विशेष मदत आयुक्त बी. पी. सेठी यांनी दिली. 

श्रीकाकुलम जिल्ह्यात मुसळधार 
आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यात "तितली'चा जोरदार तडाखा बसला. यात आठ जण मृत्युमुखी पडले आहेत. धुवॉंधार पावसामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली तर विजेचे खांब उखडले. जिल्ह्यातील अनेक मंडलांत 2 ते 26 सेंटिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती राज्य आप्तकालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली. झाडे पडल्याने रस्ते वाहतूक विस्कळित झाली होती. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी टेली कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या. 

कोकण व विदर्भात पावसाचा अंदाज 
"तितली'च्या प्रभावामुळे पूर्व किनारपट्टीसह महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 12) कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. या वादळाचा प्रभाव पश्‍चिम बंगालमध्ये फारसा जाणवला नाही. मात्र, "तितली'चा उलट प्रवास गंगेच्या त्रिभुज प्रदेशात होणार असल्याने प्रचंड पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उद्या सकाळपर्यंत वादळ निवळेल, असे हवामान विभागाने सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight dead of Titali storm in Andhra Pradesh