काँग्रेसमध्ये बंड केलेले आमदार जाणार थेट मोदींच्या भेटीला; सोमवारी घेणार भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress MLA with Pramod Sawant

काँग्रेसमध्ये बंड केलेले आमदार जाणार थेट मोदींच्या भेटीला; सोमवारी घेणार भेट

पणजी : गोव्यात या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झालेले काँग्रेसचे बंडखोर आठ आमदार सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने रविवारी सांगितले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आमदार सोमवारी सकाळी पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. (Goa Congress News in Marathi)

हेही वाचा: अभ्यासू फडणवीसांना अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय; राऊतांची जहरी टीका

बंडखोरांपैकी सहा आमदार आज रात्री विमानाने दिल्लीला रवाना होतील, तर आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत नंतर दिल्लीत पोहोचतील. हे दोघेही सध्या राज्याबाहेर आहेत.

यापूर्वी बुधवारी आमदार दिगंबर कामत, मायकेल लोबो, डेलीला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सिओ सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठराव मंजूर करून भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा: Devendra Fadnavis : निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्युट तयार करणार

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांचा गट त्यांच्या दिल्ली दौऱ्यात पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या वर्षी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आला आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे 20 आमदार होते. तर नुकत्याच झालेल्या पक्षांतरानंतर काँग्रेसचे संख्याबळ 11 वरून तीनवर आले आहे.

Web Title: Eight Mlas Who Left Congress Will Meet Prime Minister Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpNarendra ModiGoa