Eknath Shinde News : जे भाजपला ४० वर्ष जमलं नाही ते शिंदेंना जमेल ; वाचा संपूर्ण बातमी

eknath shinde
eknath shinde sakal

Eknath Shinde News : ४० वर्षांपासून जे भारतीय जनता पक्षाला जमलं नाही ते करण्याचा प्रयत्न आता एकनाथ शिंदेंची शिवसेना करत आहे. भाजप मागील जवळपास 4 दशकांपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अजून ते भाजपला जमलेल नाही.

eknath shinde
Lonavla News : तुम्हालाही काढायची आहे का लोणावळ्याला ट्रिप? तर नक्की वाचा 'ही' बातमी

कर्नाटक राज्य सोडल तर इतर कोणत्याही राज्यात भाजप जाऊ शकलेले नाही. भाजपला अद्याप केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये यश मिळालेलं नाही.मात्र आता हा प्रयत्न खुद्ध शिंदेंची शिवसेना करत आहे.

eknath shinde
Namo Shetkari Maha Samman Yojana : ‘नमो’ योजनेपासून अद्याप ३२ लाख शेतकरी वंचित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता दक्षिण भारतात पक्षविस्तार करण्याचा प्रयात्न करत आहेत. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी नुकताच दक्षिण भारताचा दौरा केला.

यावेळी तामिळनाडूतील शिवसेना प्रभारी अँड. राजेश कुमार आणि केरळ राज्यप्रमुख अँड. हरीश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये तिथल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्यस्तरीय बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. याबाबत शिवसेनेने ट्विट करुन माहिती दिली.

eknath shinde
CM Eknath Shinde : खड्ड्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री 'ऑनफिल्ड'; अधिकऱ्यांना दिले खड्डे बुजवण्याचे आदेश

राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तामिळनाडू येथील प्रभारी अँड. राजेश कुमार आणि केरळ राज्यप्रमुख अँड. हरीश कुमार यांच्या समवेत आज तेथील महत्वाच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दक्षिण भारतात हिंदुत्ववादी संघटना म्हणून शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी आणि पक्ष बळकटीकरणासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. एकंदरीत राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती शिवसेना सचिव कॅ. अभिजित अडसूळ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com