भामट्यांनी जवळपास पाच ते सहा लाख रुपये त्या भामट्या अधिकाऱ्याला दिले असल्याचे समजते. तसेच व्हिडिओ व्हायरल करतो ही धमकी दिल्याने तसेच पैशासाठी तगादा लावल्याने शेवटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
खानापूर : तालुक्यातील बिडी येथे गुरुवारी रात्री डिजिटल अटकेच्या भीतीने वृद्ध दांपत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ख्रिश्चन गल्लीतील रहिवासी डायगो संतान नाझरेथ (वय ८३) आणि त्यांची पत्नी फ्लेव्हिया डायगो नाझरेथ (वय ७९) असे त्या दांपत्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता ते मृतावस्थेत आढळून आले.