
महाराष्ट्रातून आग्र्याला ताजमहल पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटक कुटुंबाने वयोवृद्ध व्यक्तीला गाडीतच बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ताजमहाल पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाने वृद्ध व्यक्तीला गाडीतच बांधून ठेवलं. कापडाने हात पाय बांधलेल्या अवस्थेत गाडीत त्यांना सोडलं होतं. भर उन्हात गाडी उभा केली असल्यानं वृद्धाला उष्णतेमुळं अस्वस्थ वाटायला लागलं. परिसरातील लोकांना जेव्हा गाडीत वृद्ध व्यक्ती असल्याचं दिसलं तेव्हा त्यांनी काच फोडून वृद्धाची सुटका केली.