esakal | 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी वयस्कर व्यक्तीला मारहाण, दाढीही कापली; व्हिडीओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

'जय श्रीराम' म्हणण्यासाठी वयस्कर व्यक्तीला मारहाण, दाढीही कापली; व्हिडीओ व्हायरल

'जय श्रीराम' म्हणण्यासाठी वयस्कर व्यक्तीला मारहाण, दाढीही कापली; व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
विनायक होगाडे

गाझियाबाद : दिल्लीजवळील गाझियाबादमधील लोनीमध्ये एका वयस्कर मुस्लिम व्यक्तीला जोरदार मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या पीडित वयस्कर व्यक्तीचं नाव अब्दुल समद असं असून 'जय श्रीराम' म्हणण्याची जबरदस्ती या आरोपींकडून करण्यात येत होती. मारहाण करणाऱ्या आरोपींनी फक्त या वयस्कर व्यक्तीला मारहाणच केली नाहीये तर त्याची दाढी देखील कापली आहे. या दरम्यान हा वयस्कर व्यक्ती त्या सर्व आरोपींना हात जोडून सोडून देण्याची विनंती करत राहिला मात्र आरोपी त्याला मारहाण करतच राहिले. (Elderly Muslim man assaulted in Ghaziabad for not chanting Jai Shri Ram Beard Cut Off)

इतकचं नव्हे तर आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे आणि तो व्हायरल देखील केला आहे. या व्हिडीओत स्पष्टपणे दिसतंय की पीडित वयस्कर व्यक्तीला बसल्या ठिकाणी घेरण्यात आलं आहे. त्यातील एका युवकाच्या हातात कात्री आहे. या दरम्यानच दुसरा एक युवक त्यांना आळीपाळीने झापड लगावतो आहे तर पहिला युवक त्यांची दाढी कापताना दिसून येतो.

हेही वाचा: जेफ बेजोस यांच्यासोबतची अंतराळ सफर; द्यावे लागणार इतके पैसे

या पीडिताच्या सांगण्यानुसार, या आरोपींनी जय श्रीराम आणि वंदे मातरमच्या घोषणा देखील दिल्या आणि म्हटलं की, तू पाकिस्तानचा गुप्तहेर आहेस. अब्दुल यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी त्यांना असं सांगून धमकावत होते की त्यांनी याआधी देखील अनेक मुस्लिम व्यक्तींना याप्रकारेच मारलं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोनी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुख्य आरोपी प्रवेश गुज्जरला अटक केली आहे. ही घटना 5 जूनची आहे, जेंव्हा बुलंदशहरचे रहिवासी असलेले अब्दुल समद लोनी येथे आले होते. ते मस्जिदीमध्ये जाण्यासाठी एका ऑटोमध्ये बसले. आरोप असा आहे की, ऑटोमध्ये बसलेल्या काही लोकांनी जबरदस्ती त्यांना जंगलामधील एका खोलीत नेलं. त्याठिकाणी सर्वांत आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची दाढी कापण्यात आली. अद्याप बाकी आरोपींचा तपास सुरु आहे.

loading image
go to top