उद्धव ठाकरेंना ECचा झटका! १५ दिवसांत बाजू मांडण्याचे निर्देश

चार आठवड्यांच्या मुदतीची मागणी आयोगानं फेटाळून लावली आहे
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर आता निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना झटका दिला आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणीसाठी मागितलेली चार आठवड्यांच्या मुदतची मागणी फेटाळत केवळ पंधरा दिवसातच उत्तर सादर करण्याचे आदेश आयोगानं दिले आहेत. (Election Commission blow to Uddhav Thackeray Direction to give answer within 15 days)

Uddhav Thackeray
PM मोदींनी व्यंकय्या नायडूंची केली आचार्य विनोबा भावेंशी तुलना!

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणती उद्धव ठाकरे गटाची की एकनाथ शिंदे गटाची याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यानुसार शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर कोणत्या गटाचा अधिकार राहिल, यावर निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. तत्पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह उत्तर देण्यासाठी ८ ऑगस्टपासून चार आठवड्यांचा वेळ द्यावा म्हणजेच ८ सप्टेंबरपर्यंतचा वेळ द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगानं त्यांची मागणी फेटाळत केवळ १५ दिवसांत उत्तर द्यावं असे निर्देश दिले आहेत.

Uddhav Thackeray
सल्लागार समितीत शिवसेनेला हवंय स्थान; विधानसभा अध्यक्षांना पुन्हा पत्र

त्यामुळं आता २३ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगापुढं आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. म्हणजेच २२ तारखेला सुप्रीम कोर्टातील सुनावणी त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाला उत्तर उद्धव ठाकरे गटाला द्यावं लागणार आहे. यावरुन शिवसेनेला दोन्ही बाजूंनी कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com