
राजधानी नवी दिल्लीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रियेवरील आरोप आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संबंधीच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. ईव्हीएम पूर्णतः सुरक्षित असून फेरफार होण्याचा कोणताही धोका नाही.
ईव्हीएमविरोधातील आरोप निराधार आहेत आणि निवडणूक प्रक्रियेवर अकारण संशय निर्माण करणे चुकीचे आहे. सर्व राजकीय पक्षांना प्रशासन चालवायचे असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी लक्ष्मणरेषा प्रचार करताना ओलांडू नका, असा इशाराही दिला. राजीवकुमार यांनी स्पष्ट केले की, व्हीव्हीपॅट प्रणालीसह ईव्हीएम ही मतदान प्रक्रिया अधिक सुस्पष्ट व पारदर्शक बनवतात.