
प्रचाराची वेळ वाढली; निवडणूक आयोगानं 'या' अटींवर दिली परवानगी
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग आता काहीसा कमी झाल्यानं निवडणूक आयोगानं पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. विशेष म्हणजे नव्या नियमावलीनुसार आता पदयात्रांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण यासाठी काही अटी-शर्तींचं पालन करावं लागणार आहे. (Election Commission further relaxes provisions of campaigning for Assembly Elections 2022)
निवडणूक आयोगाचा हा निर्णय गोवा आणि उत्तराखंड तसेच उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी महत्वाचा ठरणार नाही. कारण या ठिकाणी येत्या १४ फेब्रुवारी मतदान पार पडणार आहे. त्यामुळं याचा प्रचार प्रक्रिया शनिवारी संध्याकाळी संपली आहे.
हेही वाचा: बँकिंग घोटाळा! ABG शिपयार्डने 28 बँकांना लावला 22,842 कोटींचा चूना
आयोगाचे प्रवक्ते अनुज चंडक यांनी ट्विट करुन सांगितलं, "आता रात्री १० वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत निवडणूक प्रचार बंद असेल यापूर्वी हे निर्बंध रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत होते. पण आता सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. पण या काळात त्यांना कोरोनाच्या नियमावलींच पालन करणं बंधनकारक आहे"
हेही वाचा: MPSC Exam : स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुख्य परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
याशिवाय राजकीय पक्षआंना कोणत्याही मैदानात किंवा सभांमध्ये जास्तीत जास्त ५० टक्के किंवा कोविडच्या नियमांनुसार सभा घेता येईल. पदयात्रा देखील ठरवून दिलेल्या संख्येनंच निघेल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल तसेच निवडणुकीशी संबंधित इतर नियमांचंही पालन करावं लागेल.
Web Title: Election Commission Further Relaxes Provisions Of Campaigning For Assembly Elections 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..