Election Commission Guidelines on AI-Generated Campaign Materials : आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून बनवलेले फोटो, व्हिडीओ आणि इतर प्रचार साहित्यांवर 'AI generated' असा स्पष्ट उल्लेख करावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षानांना पत्र लिहिलं आहे. निवडणूक प्रचारात एआयचा वाढता वापर लक्षात घेता आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.