esakal | राज्यसभेसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्रातील 7 जागा
sakal

बोलून बातमी शोधा

parliament

येत्या 26 मार्चला राज्यसभेच्या 55 जागांसाठी मतदान होणार आहे. 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. आजपासून महिनाभराने मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल.

राज्यसभेसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्रातील 7 जागा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) राज्यसभेच्या 55 जागांसाठी वेळापत्रक जाहीर केले असून, यात महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे.

येत्या 26 मार्चला राज्यसभेच्या 55 जागांसाठी मतदान होणार आहे. 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. आजपासून महिनाभराने मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह इतर राज्यात निवडणूक होणार आहे.

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मते आवश्यक असतात. त्यामुळे राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीकडून चार उमेदवार सहज निवडून जातील. तर, भाजपकडून दोन उमेदवार निवडले जातील. एक जागेसाठी मोठी चुरस असणार आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. 

loading image