Voter Fraud Claims : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतदार यादीत हेराफेरी झाल्याचा आरोप करत 'मत चोरी'सारखे शब्द वापरल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांना कठोर इशारा दिला आहे. आयोगानं स्पष्ट केलं की 'एक व्यक्ती, एक मत' हे तत्व भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून (१९५१-५२) लागू आहे आणि हे नवीन नाही.