
नवी दिल्ली : बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणीच्या (एसआयआर) मुद्द्यावरून राळ उडालेली असतानाच देशभरात अशाच प्रकारची सखोल पडताळणी करण्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोग करीत आहे. यादृष्टीने पुढील महिन्यापासून आपल्या कर्मचाऱ्यांना आयोग मैदानात उतरवणार असल्याचे समजते. बिहार पाठोपाठ पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मतदारयाद्यांची सखोल पडताळणी केली जाण्याची चर्चा होती. मात्र आता देशव्यापी पडताळणीची तयारी आयोग करीत असल्याचे मानले जात आहे.