
नवी दिल्ली : प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या काळातील सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक डेटा ही प्रक्रिया पार पडल्याच्या ४५ दिवसांनंतर नष्ट करावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना छायाचित्रण, व्हिडिओ चित्रण, वेबकास्टिंग केले जाते. कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सीसीटीव्हीही बसविले जातात. या इलेक्ट्रॉनिक डेटाचा वापर भविष्यात दुष्प्रचार करण्यासाठी अथवा अफवा पसरविण्यासाठी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याचे लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.