पाच राज्यांत कधी, कुठे, कशा होतील विधानसभा निवडणुका? वाचा सविस्तर | 5 states Assembly Elections declared By EC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5 states Assembly Elections declared By EC
Assembly Elections 2022 : कधी, कुठे, कशा होतील निवडणुका? वाचा सविस्तर

Assembly Elections 2022 : कधी, कुठे, कशा होतील निवडणुका? वाचा सविस्तर

दिल्ली : गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या निडणुकांमध्ये कोरोनाचंही आव्हान असणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज निवडणून आयोगाने (Election Commission of India) पत्रकार परीषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी याबद्दल निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची तपशीलवार माहिती दिली. “यकीन हो तो कोई रास्ता निकलता है हवा की ओट की ख़िलाफ़ भी दिया जलता है।” कोरोना महामारी से निकलेंगे हमे यकीन है! या शायरीच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वा आव्हांनाचा सामना करत निवडणूका घेतल्या जातील असं स्पष्ट केलं.

कोणत्या राज्यात, कधी पार पडणार निवडणुका?

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

 • पहिला टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

 • दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी

 • तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी,

 • चौथा टप्पा 23 फेब्रुवारी

 • पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी

 • सहावा टप्पा 3 मार्च रोजी

 • सातवा टप्पा 7 मार्च 2022 पार पडणार आहे.

पंजाब, उत्तराखंड, गोवा या तीन राज्यांमध्ये 14 फेब्रुवारी 2022 रोजी एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च 2022 रोजी दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. (5 states Assembly Elections declared By EC)

सभा, रॅली, पदयात्रांवर 15 जानेवारीपर्यंत बंदी!

 • कोरोना नियमावलीचं पालन करुनच निवडणुका पार पडतील असं आयोगाने सांगितलं आहे. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत रोडशो, पदयात्रा, सायकल रॅली काढण्यास मनाई

 • उमेदवारांच्या प्रचार रॅलीला मुभा नाही.

 • रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत प्रचारावर बंदी

 • नुक्कड सभांवर बंदी, विजयी सेलिब्रेशन करण्यास मनाई

 • त्यानंतर परिस्थिती पाहून पुढचे निर्णय घेतले जातील आणि नवीन सूचना जाहीर केल्या जातील.

कशी असेल तयारी?

 • कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मतदान असलेल्या असलेल्या सर्व राज्यांमध्ये पुरेशा CRPF तुकड्या तैनात केल्या जातील.

 • सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर मानलं जाईल. त्यानुसार सर्व पात्र अधिकाऱ्यांचं 'सावधगिरीचा डोस' म्हणून लसीकरण केले जाईल.

 • सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर केला जाईल. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने आधीच पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि VVPAT व्यवस्था केली आहे.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच डीजीपींची उचलबांगडी; चन्नी सरकारचा मोठा निर्णय

राजकीय पक्षांसाठी नियम

 • राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाइटवर गुन्हेगारी प्रकरणं प्रलंबित असलेल्या निवडणूक उमेदवारांची सविस्तर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यांना उमेदवार निवडण्याचे कारणही द्यावे लागणार आहे.

उमेदवारांना खर्चाची मर्यादा

 • गोवा, मणिपूरमधील उमेदवारांना २५ लाखांच्या खर्चाची मर्यादा

 • उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमधील उमेदवारांना ४० लाखांची खर्चाची मर्यादा

काय असतील या निवडणुकीची वैशिष्ट्य?

पहिल्यांदाच निवडणुकिच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, मात्र १५ तारखेपर्यंत उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचाराला बंदी आहे. त्यामुळे त्यांना डिजिटली प्रचारच करावा लागणार. याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना निवडणूर आयोगानं वेळापत्रक २०१७ प्रमाणेच कायम ठेवलं. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही कोरोना नियमावली पाळूनच घेतल्या जाणार आहेत. याशिवाय लशीचे २ डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावर येण्याचं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय.

ओमिक्रॉन या नव्या व्हेरीअंटमुळे कोविडची प्रकरणं वाढत असल्यानं, निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य सचिव आणि गृह सचिव, तज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्यासोबत बैठका घेतल्या. सर्वांची मतं आणि परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर,आयोगाने सुरक्षिततेच्या निकषांसह निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला असं मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :assembly Election
loading image
go to top