निवडणुकीपूर्वीच डीजीपींची उचलबांगडी; चन्नी सरकारचा मोठा निर्णय I Punjab Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddhartha Chattopadhyay

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच चन्नी सरकारनं अधिकाऱ्यांची नावं यूपीएससी पॅनलकडं पाठवली होती.

निवडणुकीपूर्वीच डीजीपींची उचलबांगडी; चन्नी सरकारचा मोठा निर्णय

निवडणूक आचारसंहितेच्या अवघ्या काही तासांपूर्वी पंजाब सरकारनं (Punjab Government) डीजीपी (पोलीस महासंचालक) सिद्धार्थ चट्टोपाध्याय (Siddhartha Chattopadhyay) यांची बदली करून व्ही. के. भावरा (V. K. Bhavra) यांची नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती केलीय. पीएम मोदींच्या (Narendra Modi) सुरक्षेबाबत डीजीपींवरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत, त्यामुळेच हा निर्णय घेतला की, काय? अशी चर्चा सुरुय.

पंजाबात निवडणूक (Punjab Assembly Election) आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंजाब सरकारनं (आयपीएस IPS) अधिकाऱ्यांची नावं यूपीएससी पॅनलकडं पाठवली होती. यापैकी व्ही. के. भावरा यांची नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. भावरा हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी दक्षता प्रमुख म्हणूनही काम केलंय.

हेही वाचा: UPSC नं अनेक पदांसाठी जाहीर केली भरती

खरं तर पंजाबमध्ये सरकार बदलताच कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांचे निकटवर्तीय दिनकर गुप्ता यांना डीजीपी पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच ते रजेवर गेले होते. यानंतर आयपीएस सहोता यांना पहिले कार्यरत डीजीपी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या आक्षेपानंतर सिद्धूच्या निकटवर्तीय आयपीएस सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांच्याकडं डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

हेही वाचा: 'सत्तेच्या भुकेसाठी मोदींनी पुलवामा घटना घडवून आणली'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top