Viksit Bharat: मोदी सरकारचा व्हॉट्सअॅप प्रचार बंद होणार! निवडणूक आयोगाकडून 'विकसित भारत'चे मेसेज थांबवण्याचे आदेश

विकसित 'भारत संपर्क' या मेसेजद्वारे मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली आहे.
WhatsApp
WhatsAppEsakal

नवी दिल्ली : लोकांना व्हॉट्सअॅपवरुन 'विकसित भारत' नामक जाहिरातीतून मोदींची गॅरंटी आणि मोदींनी केलेल्या कामाची माहिती पोहोचवली जात आहे. सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे, तरीही व्हॉट्सअॅपवर सरकारी जाहिराती येत असल्यानं याबाबतच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळं आयोगानं या जाहिराती व्हॉट्सअॅपवरुन पाठवणं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. (election commission says to it ministry stop sending viksit bharat messages on whatsapp)

WhatsApp
GST Fraud Case: 2,600 बनावट कंपन्या अन् सरकारला लावला हजारो कोटींचा चुना; बड्या व्यावसायिकांना अटक

निवडणूक आयोगानं गुरुवारी सांगितलं की, आयोगानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला निर्देश दिले आहेत की, जनतेच्या व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येणारे विकसित भारतचे मेसेज तातडीनं थांबवण्यात यावेत. तसेच आयोगानं आयटी मंत्रालयाकडून या प्रकरणाचा अनुपालन अहवालही मागवला आहे. (Latest Marathi News)

WhatsApp
Sharad Pawar: शरद पवारांचा मास्टर प्लॅन काय? महादेव जानकर, नितेश कराळेंशी चर्चा! गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून

दरम्यान, आयोगानं सांगितलं की, याबाबत आमच्याकडं अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "सध्या देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असतानाही लोकांच्या फोनवर सरकारी जाहिरातील पाठवल्या जात आहेत" (Marathi Tajya Batmya)

WhatsApp
Fact Check Unit: केंद्र सरकारला धक्का! 'फॅक्ट चेक' युनिटच्या सूचनेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

निवडणूक आयोगाच्या आदेशाला उत्तर देताना आयटी मंत्रालयानं सांगितलं की, "या जाहिरातीसंबंधीचं पत्र आणि मेसेज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठवण्यात आले होते. पण लोकांच्या मोबाईलला कदाचिक व्यवस्थित नेटवर्क येत नसल्यानं हे मेसेज उशीरा रिसिव्ह झाले असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com