कमलनाथ यांना आयोगाचा दणका

कमलनाथ यांना आयोगाचा दणका

नवी दिल्ली - महिला नेत्यांविरोधातील वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाचे कारण देत काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. यानंतरही त्यांना प्रचारासाठी बोलावल्यास सभेचा खर्च पक्षाऐवजी उमेदवाराच्या खर्चात दर्शविला जाईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 3 नोव्हेंबरला राज्यातील 28 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कमलनाथ हे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यामुळे, राज्यात विधानसभेच्या 28 जागांसाठी सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये त्यांच्यावरील या कारवाईमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते असलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचेही नाव अग्रस्थानी आहे. अलिकडेच, त्यांनी भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल काढलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ झाला होता. काँग्रेस नेते राहुल गांधींनी या वक्तव्यावर जाहीर नापसंती व्यक्त करूनही कमलनाथ यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. 

आता निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या कारणाखाली कमलनाथ यांना काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळून प्रचारास मनाई केली आहे. या मनाई आदेशानंतरही त्यांना प्रचाराला बोलावल्यास सभेचा खर्च उमेदवाराच्या खर्चात गणला जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘चुन्नू-मुन्नू’बद्दल विजयवर्गीय यांना नोटीस
नवी दिल्ली - मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते दिग्विजयसिंह व कमलनाथ यांना ‘चुन्नू-मुन्नू’ची उपमा देणारे भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान आपले ‘चुन्नू-मुन्नू’ विधान गरजेपेक्षा जास्त गंभीरपणे घेण्यात आले असल्याचा दावा विजयवर्गीय यांनी नोटीशीला उत्तर देताना केला आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com