
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (एपिक क्रमांक) ‘आधार’शी जोडण्यासाठी तांत्रिक चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गतच ही प्रक्रिया राबविली जाईल, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.