
नवी दिल्ली : निवडणुकांमध्ये मतांची चोरी केली जात असल्याचा आरोप मागील काही काळापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चालवला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘‘पुरावे द्या, अन्यथा मतचोरी सारख्या गलिच्छ शब्दांचा प्रयोग करू नका,’’ असा सल्ला निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना दिला आहे.