Prakash Javdekar: प्रकाश जावडेकरांवर मोठी जबाबदारी; भाजपची निवडणूक प्रभारीपदं जाहीर

या वर्षाच्या शेवटी चार राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.
Prakash Javdekar
Prakash Javdekar

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गेल्यावेळच्या विस्तारावेळी मंत्रीपद गमवावं लागल्यानंतर आता भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या खाद्यावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये जावडेकरांकडं तेलंगाणा राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Election in-charge posts of BJP announced Prakash Javdekar gives responsibility of Telangana)

Prakash Javdekar
NCP Constitution: "कोणीही कोणाला काढू शकत नाही, राष्ट्रवादीची रचनाच फ्रॉड"; पटेलांचा मोठा दावा

या वर्षाच्या शेवटी देशातील चार राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर या चारही राज्यांच्या निवडणूक प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्त्या भाजपनं जाहीर केल्या आहेत. यामध्ये ९ जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांचाही समावेश आहे. (Latest Marathi News)

भाजपतील नव्या नियुक्त्या अशा

१) राजस्थानचे निवडणूक प्रभारी म्हणून प्रल्हाद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नितीन पटेल आणि कुलदीप बिश्नोई यांची सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२) छत्तीसगडच्या निवडणूक प्रभारीपदी ओम प्रकाश माथूर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच डॉ. मनसुख मांडवी यांना इथं सह प्रभारी बनवण्यात आलं आहे.

३) तेलंगाणाच्या प्रभारीपदाची जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यांना सुनील बन्सल हे सहकार्य करणार आहेत.

४) मध्य प्रदेशच्या प्रभारीपदी भुपेंद्र यादव यांची तर सह प्रभारी म्हणून आश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com