पोटनिवडणुकीचा आज निकाल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या उद्या (गुरुवारी) जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

मुंबई - नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या उद्या (गुरुवारी) जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मतदान यंत्रातील बिघाडामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात आज 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, कैराना लोकसभा पोटनिवडणुकीतही आज 73 केंद्रांवर फेरमतदान झाले. याठिकाणी 61 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली. 
 

Web Title: by-election result declaration today