बेळगाव शहरात लवकरच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 September 2019

बेळगाव - शहरात लवकरच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी पॉईंट सुरू केले जाणार आहेत. यासाठी हेस्कॉमने पुढाकार घेतला आहे.  हेस्कॉमच्या अखत्यारीत येणाऱ्या सात जिल्हांमध्ये 100 ठिकाणी वाहन चार्जिंग केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव - शहरात लवकरच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी पॉईंट सुरू केले जाणार आहेत. यासाठी हेस्कॉमने पुढाकार घेतला आहे.  हेस्कॉमच्या अखत्यारीत येणाऱ्या सात जिल्हांमध्ये 100 ठिकाणी वाहन चार्जिंग केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव व धारवाड - हुबळी शहरात प्रत्येकी 25 ठिकाणी तर बागलकोट, विजापूर, हावेरी व गदग येथे प्रत्येकी 10 तर शिर्शि येथे 5 वाहन चार्जिंग केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.   हेस्कॉमने शहरात वाहन चार्जिंग केंद्रे सुरु करण्यासाठी 27 ठिकाणांची निवड केली आहे. यापैकी 25 ठिकाणी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. 

केंद्राने इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुर्वीच कर्नाटक सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांबाबत धोरण निश्‍चित केले आहे. हेस्कॉमच्या सरव्यवस्थापकांनी बेळगावसह सात जिल्हांच्या मुख्य इंजिनियरंना पत्र लिहुन वाहन चार्जिंग केंद्रे सुरु करण्याबाबत जागा निश्‍चित करण्यास सांगितले आहे.

एक हजार स्केअर फुटच्या जागेत 6 चार्जिंग पॉईंट असणार आहेत तसेच या ठिकाणी दुचाकी व चार चाकी वाहने चार्जिंग करण्याची सोय हेस्कॉमकडून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनांतील चार्जिंग संपले म्हणून वाहन ढकलण्याची वेळ चालकांवर येणार नाही तसेच नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.                                     

वाहन चार्जिंग पॉईंट सुरू करण्यासाठी वेळ लागणार आहे. सध्या पॉईंट सुरू करण्यासाठी जागांची निवड करण्याचे काम सुरू आहे. चार्जिंग पॉईंट सुरू झाल्यानंतर वाहन चालकांची चांगली सोय होणार आहे.            

- अश्विन शिंदे, सहायक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम                                  
चार्जींग पॉईंट बसविण्यासाठी निवडण्यात आलेली ठिकाणे - 
1. सदाशिवनगर, एपीएमसी 
2. आरटीओ सर्कल 
3. जेएनएमसी महाविद्यालय 
4. चन्नम्मा सर्कल 
5. श्रीनगर 
6. कणबर्गी 
7. ऍटोनगर औद्योगिक परिसर 
8. अशोकनगर 
9. आझमनगर 
10. बॉक्‍साईड रोड 
11. केएलई स्कुल, कुवेंपुनगर 
12. गणेशपुर रोड 
13. जुना धारवाड रोड 
14. विमानतळ रोड 
15. सीबीटी 
16. वडगाव 
17. हिंदवाडी 
18. भाग्यनगर 
19. अनगोळ 
20. टिळकवाडी 
21. खानापूर रोड 
22. मंडोळी रोड 
23. गुरुप्रसाद कॉलनी 
24. चन्नम्मानगर 
25. उद्यमबाग औद्योगिक परिसर 
26. केएलई महाविद्यालय रोड 
27. जुने बेळगाव ( हलगा रोड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric vehicle charging point soon in Belgaum city