

Trained elephants of the ‘Elephant Brigade’ assist forest officials in rescuing an injured wild elephant at Palamu Tiger Reserve, Jharkhand.
Sakal
जंगली हत्ती जखमी झाल्यानंतर त्याचा शोध घेणे, त्याच्यापर्यंत पोहोचणे आणि उपचारासाठी त्याला सुरक्षितपणे हाताळणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान असते. मात्र, झारखंडमधील बेतला नॅशनल पार्क आणि पलामू टायगर रिझर्व्ह (PTR) येथे वन कर्मचाऱ्यांना या कामात चार प्रशिक्षित हत्तींची विशेष मदत मिळते. ‘एलिफंट ब्रिगेड’ म्हणून ओळखले जाणारे हे पथक नुकतेच ‘भल्ला’ नावाच्या जखमी जंगली हत्तीच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.