Elephant Maya: ‘माया’च्या मदतीला अंबानींची ‘वनतारा’; केरळहून हवाई मार्गाने जामनगरमधील उपचार केंद्रात दाखल

Elephant Maya Airlifted from Kerala : केरळमधील १८ महिन्यांच्या माया हत्तीच्या पिल्लाला दोन्ही पुढच्या पायांची हाडे फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. उपचारांसाठी तिला विशेष हवाई रुग्णवाहिकेने जामनगर येथील वनतारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
Elephant calf Maya arrives at Vantara in Jamnagar for specialized medical treatment after being airlifted from Kerala.

Elephant calf Maya arrives at Vantara in Jamnagar for specialized medical treatment after being airlifted from Kerala.

esakal

Updated on: 

जामनगर : केरळमधील मलयाट्टूर वन विभागाच्या कप्रिक्काड परिसरात जन्मत:च आई आणि कळपापासून दुरावलेल्या, वन कर्मचाऱ्यांच्या मायेच्या सावलीत वाढलेल्या १८ महिन्यांच्या ‘माया’ या हत्तीच्या पिल्लाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बागडताना पडल्याने पुढच्या दोन्ही पायांची हाडे मोडल्याने तिला उभे राहणेही कठीण झाले आहे. मायाच्या असह्य वेदनांवर फुंकर घालून नवसंजीवनी देण्यासाठी अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. तिला केरळमधून हवाई मार्गाने आज गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’च्या अतिदक्षता उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...