Video: ...अन् हत्तीने मारली कोलांटी उडी!

वृत्तसंस्था
Wednesday, 29 April 2020

हत्तींचा कळप नदीमध्ये उतरत असताना एका हत्तीने कोलांडी उडी घेतली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

नवी दिल्ली: हत्तींचा कळप नदीमध्ये उतरत असताना एका हत्तीने कोलांडी उडी घेतली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

...अन् पत्नीच्या तोंडाला प्रेमानं लावला मास्क!

आएफएस ऑफिसर प्रवीण कासवान यांनी ट्विटरवरून हत्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हत्तींचा एक कळप नदीत उतरताना दिसत आहे. मात्र, त्यावेळी 2 हत्तींची खूप गम्मत होते. यामधील एक हत्ती सावकाश कोरड्या नदीपात्रात उतरतो. मात्र, दुसरा हत्ती सरकणाऱ्या वाळूचा वापर करत कोलांटी उडी मारून नदीपात्रात उतरत असल्याचे दिसते.

कासवान यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, 'नदीत उतरण्याचे दोन प्रकार असतात. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट नाही. पण, व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elephant viral video on twitter shared by ifs officer parveen kaswan goes viral