esakal | ...अन् पत्नीच्या तोंडाला प्रेमानं लावला मास्क!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus bride and groom use mask in wedding at chattisgadh photo viral

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन असून, या काळातही नियमांचे पालन करत अनेकजण विवाह करत आहेत तर काहीजण रद्द करत आहेत.

...अन् पत्नीच्या तोंडाला प्रेमानं लावला मास्क!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रायपूर (छत्तीसगड): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन असून, या काळातही नियमांचे पालन करत अनेकजण विवाह करत आहेत तर काहीजण रद्द करत आहेत. विवाहातील एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिस म्हणाले; लग्न करायचे का मग ये बाजूला...

कोरोना व्हायरसचा मोठा फटका विवाहसमारंभांना बसला आहे. पण या लॉकडाऊनमध्येही सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून विवाह करताना दिसत आहेत. लॉकडाऊनदरम्यान ठिकठिकाणी होणाऱया विवाहाची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बिलासपूरमध्ये लॉकडाऊनदरम्यान एक विवाह सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या विवाहादरम्यान नवरदेवाने मंगळसूत्र घालण्याआधी पत्नीच्या तोंडाला प्रेमानं मास्क लावला. त्यानंतर मंगळसूत्र घालून सात फेरे घेतले. या विवाहाची परिसरात चर्चा रंगली आहे.

नवरा म्हणाला; सायकलवर फक्त व्यवस्थित बस...

छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता सिंह देव यांनी ट्विटरवरून छायाचित्र व्हायरल केले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे लग्न केल्याचा हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या दोघांचेही कौतुक केले आहे.