Tesla India Exit : देशात इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) म्हणाले, "नवीन धोरणाचे उद्दिष्ट २०७० पर्यंत भारत सरकारचे निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करणे, भारताला ऑटोमोटिव्ह उत्पादन, नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे आहे. यामुळे भारतात रोजगार निर्मिती आणि मेक इन इंडियाचे (Make in India) ध्येय साध्य होण्यास मदत होईल.