
बिग बॉस विजेता, प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता एल्विश यादवच्या निवासस्थानी पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडलीय. घराजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळाबार केला. २५ पेक्षा जास्त गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गुरुग्राममधील सेक्टर ५७मध्ये पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.